ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हद्द २’ एक अनहोनी घटना चित्रपटाचे चित्रीकरण बेहद्द आनंदाचा वातावरणात वेगात सुरू

चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात - मार्च २०२४ होळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल

चांदा ब्लास्ट
चंद्रपूरच्या प्रथम चंद्रपुरी चित्रपट ‘एक’ मर्यादाच्या  अपूर्व यशाने भारावून व चंद्रपूरकरांची आग्रहाची मागणी लक्षात ठेवून ‘हद्द २’एक अनहोनी घटना या दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती राज्याचे संस्कृती व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांच्या साक्षीने मुहूर्त करून चित्रपट चित्रीकरण सुरू झाले आहे.
      एक पारिवारिक कथा चित्रपटाच्या विषय असून पूर्णपणे सर्वच कलावंत चंद्रपूरकरच आहे चित्रपट निर्माता सुदेश भालेकर व देवा रमेश बुरडकर प्रीतम ईश्वर खोब्रागडे हे त्रिकूट असून त्यांना प्रशांत कक्कड संजय रामटेके प्रजेस घडसे अश्या दिग्गज नाट्य कलावंतांची साथ लाभली आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण जगन्नाथ बाबा मठ शेजारी, पठाणपुरा, सितारा बारमागे, वन भवन नागपूर रोड सारख्या परिसरात सुरू असून चंद्रपूरच्या नागरिकांचे भरपूर सहयोग व अपार प्रेम याचा अनुभव पावलो पावली लाभत आहे. चित्रपटातील अनेक पात्र म्हणून चंद्रपुरातील जानते चेहरे यात अभिनय करीत आहे ज्यामध्ये काही नवोदित कलावंत सुद्धा प्रथमच अभिनय करत आहे कलावंताची फेरहिस्त अशी आहे गौरव भट्टी, कल्याणी भट्टी,बलराम सिंग सेंगर ,स्नेहल राऊत, भार्गव खोब्रागडे, जोशना निमगडे, मृणाली कांबळे, सुयोग अवथरे, राजू खोब्रागडे, विनोद धकाते, जय अंड्रस्कर, अमित शास्त्रकार, रमेश तांडी, प्रदीप निमगडे, रोशन गजभिये, नम्रता पित्तुलवार, गणेश साळवे, तरुण विश्वास, प्रज्ञा जीवनकर, सुशांत भांडारकर, रमेश खातखेडे, नरेश बुरडकर, एकता पितुलवार, धनंजय तावडे, प्रकाश परमार इत्यादी कलावंतांच्या अभिनयाने हा चित्रपट साकार  होतोय.
यांचा सुरेख अभिनय चंद्रपूरकरांना नक्कीच भावेल चित्रपटात तीन गाणी असून लवकरच यातील गाणी आपणास बघायला व ऐकायला मिळेल चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात असून मार्च 2024 होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपटगृहात दाखल होईल असा मानस आहे.
  (चंद्रपुरातील विभिन्न क्षेत्रातील नामवंतांनी चित्रीकरणासाठी असलेल्या जागेवर प्रत्यक्ष भेट देऊन कलावंतांना शुभेच्छा प्रदान केल्या यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, माजी उपमहापौर राहुल पावडे, शिक्षक संघाचे आमदार सुधाकर अडबाले,योग नृत्य संस्थापक गोपाल मुंदडा ) असे एका पत्रकान्वये प्रसिद्धी प्रमुख प्रकाश परमार  यांनी  कळविले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये