ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सीमेवरील पहाडावर कोंबड्यांची जीवघेणी झुंज अन् जुगारांचा मेळा

चंद्रपूरपूचा सट्टा किंग पोहोचला निसर्गरम्य पर्वतावर ; पोलिसांच्या आशीर्वादाने बहरला कोंबड बाजार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

 अनेकांचा संसार उघड्यावर येण्याची शक्यता

जिवती :- कुठल्याही गावात किंवा परिसरात झुंज आणि जुगारांचा मेळा भरविणे कायद्याने बंदी असतानाही पोलिसांच्या आशीर्वादाने जिवती तालुक्यातील भारी गावालगत असलेल्या बाबापुर परिसरात चक्क कोंबड्यांची जीवघेणी झुंज आणि जुगारांचा मेळा गेल्या काही दिवसांपासून थाटल्याने पहाडावर अनेक नागरिकांना याची चट्क लागण्याची शक्यता आहे.कोंबड्यांची झुंजीत शर्यत लावण्यासाठी आणि झेंडीमुंडीचा जुगार खेळण्यासाठी विविध गावातून शोकिंन ग्राहक येत, दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने निसर्गरम्य पर्वत आता झुंजीमुळे अन् झेडीमुंडीच्या जुगारांने बहरला जात आहे.जिवती परिसरातील गावात कधीच कोंबडा बाजार आणि जुगारांचा मेळा भरला गेला नाही अचानक हा कोंबड्यांचा बाजार अन् जुगारांचा मेळा कुणाच्या पाठबळांने बहरला गेला.कोंबडा बाजार आणि जुगार खेळविण्यासाठी कुणी हातमिळवणी त्यात किती रक्कमेची तोडी झाली याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.

जिवती तालुक्यातील भारीलगत असलेल्या बाबापुर गाव तेलंगणा सीमेवर आहे येथून हाकेच्या अंतरावर तेलंगणा राज्याची अनेक गावे आहेत.सदर परिसर डोंगरांनी आणि निसर्गाच्या सान्निध्यात असून या परिसरात सहसा कुठल्याच अधिकाऱ्यांची वर्दळ नसते.याचाच फायदा घेत चंद्रपूरच्या सट्टाकिंग कैलास ने आता निसर्गाच्या कुशीत कोंबड्यांची जीवघेणी झुंज आणि झेंडीमुंडी जुगारांचा मेळा भरवून अनेकांना चटक लावत पैसा उकळण्याच काम राजरोसपणे सुरु आहे.बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या तीन दिवस त्यांचे ठरलेले असून या तिन दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने परिसरातील अनेक शौकिन बांधवांचा संसार उघड्यावर येणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.निसर्गाच्या कुशीत भरविल्या जात असलेल्या कोंबडबाजारात कोंबड्यांची शर्यत खेळली जाते. त्यांच्या पायात धारदार शस्त्र घालून ही झुंज लावली जाते. या जिवघेण्या शर्यतीत कोंबड्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा प्रकार प्राण्यांच्या क्रूरतेत येतो. त्यामुळे सरकारने यावर बंदी आणली आहे. असे असताना देखील जिल्ह्यात हे कोंबडबाजार सुरू आहेत. एका कोंबडबाजाराचे अर्थकारण हे कोट्यवधीच्या घरात आहे. कोंबड्याच्या एका शर्यतीत लाखोंची बोली लावली जाते. सोबत झेंडीमुंडी, पत्त्याचा जुगार देखील खेळला जातो.

सध्या हा कोंबडबाजार महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या भारी-बाबापूर येथे जोमात सुरू आहे. तेलंगणा राज्यात असे अवैध धंदे पोलीस प्रशासन चालू देत नाहीत. मात्र येथे जुगार खेळणारे शौकीन बरेच आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तर अशा शौकिनांची काही कमी नाही. याचाच फायदा घेत भारी-बाबापूर परिसरात चंद्रपूरचचा सट्टाकिंग म्हणून नावाजलेला कैलास नामक व्यक्तीने कैलाश नामक व्यक्तीने चक्क पहाडी भागाचा आधार घेऊन भ्रष्ट यंत्रणेशी हातमिळवणी करून हा धंदा सुरू केल्याची माहिती आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या तीन दिवस हा कोंबडबाजार सुरू असतो. असे असताना ह्या अवैध धंद्यावर अद्याप कुठली कारवाई झाली नाही. त्यामुळे या अवैध धंद्याला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये