Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासंबंधी शासनाचे आदेश

चांदा ब्लास्ट

        दि.२४ डिसेंबर १९८६ या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती. तेव्हापासून भारतात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.

      त्यामुळे ग्राहक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ डिसेंबर २०२३ ला एक आदेश काढून राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यासंबंधी प्रशासनाला निर्देश दिले असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष नंदिनी प्रकाश चुनारकर यांनी दिली असून या संबंधाने जिल्ह्यातील ग्राहकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून ग्राहक कायदा व त्याअनुषंगाने इतर बाबी जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.

ग्राहक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम प्रशासनाद्वारे राबविण्यात येणार आहे. शिबिर, कार्यशाळा, भित्तीपत्रके, लोकगीत, पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

शासनाकडून निधी तरतूद होणार

     राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजनासाठी शासनाकडून ३५००/- रूपयेची तरतूद अपेक्षित आहे.

या वर्षीची ग्राहक दिनाची संकल्पना Consumer protection in the era of e-commerce and digital trade.अशी निश्चित केली आहे.

ग्राहक कायदा अस्तित्वात येण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे बिंदू माधव जोशी, राजाभाऊ पोफळी इ. पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतल्याची माहिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदिनी प्रकाश चुनारकर यांनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्यभरातील ग्राहकांनी, ग्राहक चळवळीतील पदाधिकारी यांनी ग्राहक कायदा व त्या अनुषंगाने इतर आवश्यक माहिती जाणून घेण्याचे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ.नारायण मेहरे, सचिव नितीन काकडे, संघटनमंत्री डॉ.अजय गाडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर, सचिव प्रभात कुमार तन्नीरवार, संघटनमंत्री वसंत वऱ्हाटे, प्रविण चिमूरकर,आण्याजी ढवस, संगिता लोखंडे, जितेंद्र चोरडिया, पुरूषोत्तम मत्ते,मधूसुदन भूमकर,राम चिचपाले, वामन नामपल्लीवार, आशिष कोटकर, सदानंद आगबत्तनवार, भाग्यश्री भूमकर, सुनील वनकर आदींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये