ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांग्रेस कमिटीचा सा.बा.कार्यालयावर घेराव

तालुक्यातील विविध कामात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार - डॉ. सतीश वारजुकर

चांदा ब्लास्ट

सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर अंतर्गत विविध सिमेंट नाल्या ,रस्ते कामे निकृष्ट दर्जाचे झाले असून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कांग्रेस चे विधानसभा समनव्यक डॉ सतीश वारजूकर यांनी पत्रकार परिषद मध्ये केला असून दरम्यान तालुका कांग्रेस कमिटी च्या वतीने धडक मोर्चा काढून एसडीई यांना जॉब विचारीत घेराव करण्यात आला.

तालुका कांग्रेस ऑफिस ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग पर्यत धडक मोर्चा काढण्यात आला असून याप्रसंगी डॉ सतीश वारजूकर यांनी तालुक्यातील विविध कामात सिमेंट नाल्या ,रस्ते निकृष्ट दर्जा असल्याचे सांगत एसडीई उपगलनवार यांना जॉब विचारले.

यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष विजय गावंडे, विलास डांगे, कृष्णा तपासे, अवि अगडे,विनोद ढाकूनकर,वनिता मगरे, गीतांजली थुटे, नर्मदा रामटेके, नागेद्र चट्टे, पपु शेख,प्रीती दीडमुटे, आमोद गौरकर आदी महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर अंतर्गत विविध कामे नियमानुसार सुरळीत होते आणि सुरू आहे.जर काही ठिकाणी चुका आढळल्यास त्या दुरुस्ती करण्यात येईल. असे सांगितले

समीर उपगलनवार
उपविभागीय अभियंता
सा बा उपविभाग चिमूर.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये