ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामान्य रुग्णालय वर्धा येथील रुग्णालयातील सुविधांचा अभाव; रुग्णांची होत आहे गैरसोय…

सचिन वाघ सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय वर्धा यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे...

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा.नामदार वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी वर्धा जिल्हात लक्ष देणे अत्यंत गरजेचे…

वर्धा : वर्धा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे सामान्य रुग्णालय वर्धा सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा दिसून येत नाही यामध्ये रुग्णांना करीता मेल मेडिसीन वार्ड डिलेवरी वार्डात गरोदर महिला करीता आणि अपंग व्यक्तींना लिफ्टची अत्यंत गरज असल्याने त्यांच्या करीता लिफ्ट बसविण्यात आली होती परंतु दिड ते दोन वर्षे पूर्ण झाले असून ही लिफ्ट दुरुस्त करण्यात आलेली नाही यावेळी रुग्णांना व रुग्णांनाच्या नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि यावेळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागा पण उपलब्ध नाही आहे तर रुग्णांनाचे नातेवाईक दवाखान्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर झोपून दिसून येत आहे तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव कमी असल्याचे दिसून येत आहे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातील एका बॅरेकला आग लागल्याची घटना पण समोर आली होती. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना अपुऱ्या सुविधांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रुग्णालयात स्वच्छता, सुरक्षा, वैद्यकीय उपकरणे, पुरेसे आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या स्टाॅफ पण कमी असल्यामुळे रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वर्धा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांच्या सोयी-सुविधांचा अभाव कमी असल्याचे दिसून येताच स्थानिक नागरिकांनी शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये