ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भविष्यात ‘डेटा स्ट्रक्चर’ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या अनेक पैलूंमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. – डॉ. प्रांजल बोगावार

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे 'डेटा स्ट्रक्चर' या विषयावर व्याख्यान संपन्न.

चांदा ब्लास्ट

एस. एन. डी. टी.  महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी बीसीए च्या विद्यार्थिनी  करिता “डेटा स्ट्रक्चर” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आकार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट फॉर वुमन, नागपूर च्या प्रभारी प्राचार्य तसेच एस. एन. डी. टी.  महिला विद्यापीठ मुंबई च्या मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर डॉ. प्रांजल बोगावार विशेषत्वाने उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले तसेच प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रांजल बोगावार यांनी डेटा स्ट्रक्चर यावर आपले मत मांडले, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम हे कॉम्प्युटर सायन्सचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. डेटा स्ट्रक्चर्स आम्हाला डेटा व्यवस्थित आणि संग्रहित करण्याची परवानगी देतात, तर अल्गोरिदम आम्हाला त्या डेटावर अर्थपूर्ण पद्धतीने प्रक्रिया करण्याची परवानगी देतात. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम शिकणे तुम्हाला एक चांगला प्रोग्रामर बनण्यास मदत करेल. तुम्ही कोड लिहिण्यास सक्षम असाल जो अधिक कार्यक्षम आणि अधिक विश्वासार्ह आहे. आपण समस्या अधिक जलद आणि अधिक प्रभावीपणे सोडविण्यास सक्षम असाल.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले, डेटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे प्रक्रिया गती, डेटा शोधणे, एकाधिक विनंत्या हाताळणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. डेटा रचना कार्यक्षमतेने डेटा व्यवस्थापित, व्यवस्थापित आणि संचयित करण्याचा एक मार्ग प्रदान करते. डेटा स्ट्रक्चरच्या मदतीने, डेटा आयटम सहजपणे पार केले जाऊ शकतात. तसेच भविष्यात पुन्हा असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी सहा. प्राध्यापिका खुशबू जोसेफ, अश्विनी वाणी, श्रुतिका राऊत आदिसह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शीतल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये