आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” राबविण्यासाठी जुनोना गावात ‘बिबट-ग्राम-सत्याग्रह’ आंदोलन

प्रलंबित जिल्हा परिषदेची "बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना" त्वरित सुरू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

गावात येणारे बिबट आणि बिबट मानव संघर्ष यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी

चंद्रपूर जिल्हयात ‘मानव-वन्यप्राणी संघर्ष’ तीव्र झालेला असून, यात वाघ, बिबट, अस्वल अन्य वन्यप्राणी कडून जंगलात तसेच गावात होणारे हल्ले रोखण्याकरिता जिल्हा परिषदेची गावा-गावात राबविली जाणे आवश्यक असलेली प्रलंबित “बिबट समस्या मुक्त ग्राम योजना” राबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनच्या पाचव्या दिवशी पाचवे आंदोलन इको-प्रो कडून जुनोना गावात करण्यात आले.

बंडू धोतरे यांचे नेतृत्वात सकाळी जुनोना गावात येथे बिबटचा वावर असलेल्या वस्तीत जाऊन नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. एके ठिकाणी काही गावकरी यांना जमा करून बिबट गावात येणाचे कारणे विषयी माहिती देण्यात आली. बिबट गावात आल्यावर, गावकरी वर हल्ले झाल्यावर, बिबट्यास जेरबंद करणे यापेक्षा बिबट गावातच येणार नाही याकरिता काय केले पाहिजे. गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदच्या माध्यमाने काय काय उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून बिबट गावात येणार नाही यासाठी “बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना” प्रभावी ठरणार असल्याची माहिती देत ही योजना प्रत्येक बिबट समस्या असलेल्या गावात प्राधान्याने राबविली गेली पाहीजे याचे महत्व सांगितले.

*2018 पासून सुरू आहे पाठपुरावा…*

2018 पासून विविधस्तरावर पाठपुरावा करून, वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी, मंत्री यांचेकडे सुद्धा सादरीकरण झालेले आहे. जिल्हयातील वाघ-मानव संघर्ष यावर ‘राज्यस्तरीय अकरा सदस्यीय तांत्रिक समिती’ तयार करण्यात आलेली होती, या अहवाल मध्ये सुद्धा बिबट समस्यांमुक्त ग्राम योजनेची शिफारस करण्यात आली, सोबतच राज्यस्तरीय ‘बिबट-मानव संघर्ष’ यावर सुद्धा तयार करण्यात आलेल्या समितीने शिफारस केलेली आहे. या दोन्ही अहवालास ‘राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ’ ने अहवाल मंजूर केलेला आहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रायोगिक ठरणार आहे, मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली दिसून येत नाही आहे.

*बिबट किंवा वाघ मानव संघर्ष मधला फरक व योजनेचे महत्व*
जंगलात आत गेल्यावर किंवा शेतशिवारात वाघ आल्यास वाघ कडून मानवावर हल्ले होतात. मात्र बिबटयाकडून होणारे हल्ले ‘बिबट’ थेट गावात येत असल्याने गावात मानवावर हल्ले होतात. बिबट गावात खाद्यासाठी म्हणजे शिकार करण्यास येतात, प्रामुख्याने बिबट कुत्री-डुकरी जे उकरिड्यावर, अस्वच्छतेमुळे वाढणारी प्राणी आहेत याकडे आकर्षित होतात. यांची संख्या गावातील अस्वच्छता यामुळे वाढत असते. यांची शिकार करण्यास बिबटचे वावर नेहमीच जंगलव्याप्त किंवा जंगलालगतच्या गावात असल्याने गावकरी, लहान मुले यांचे जीव धोक्यात येतात. यावर उपाय म्हणून बिबट गावात येणाची कारणे शोधून दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमाने “बिबट समस्यामुक्त ग्राम योजना” प्रस्तावित असून या अंतर्गत अश्या ग्रामपंचायतना स्वच्छता विषयक कामांना आवश्यक कामाकरिता निधीची पुरवीने व कार्य करणे आवश्यक आहे.

या योजने विषयी व्यापक जागृती व शासन-प्रशासन कडून राबविण्याच्या दृष्टीने बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी करीता “बिबट-ग्राम-सत्याग्रह” करण्यात आले, यावेळी बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो यांचे नेतृत्वात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, धर्मेंद्र लुनावत, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, सुन्नी दुर्गे, रोहित तळवेकर, मेघश्याम पेटकुले, योजना धोतरे, सुभाष टिकेदार सहभागी झाले होते.

बिबट समस्यांमुक्त ग्राम योजना राबविण्याची मागणी व गावे बिबट पासून भयमुक्त करण्यास गावागावात जागृती केली जाणार असून येत्या काळात या मागणीकरिता तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बंडू धोतरे यांनी दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये