घुग्घुस नगर परिषदेची गणेश विसर्जनासाठी तयारी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) : गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्याच दिवशीपासून गणेश विसर्जनाला सुरुवात होत आहे. यासाठी घुग्घुस नगर परिषद प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शहरात एकूण 4 ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले आहेत. यात बस स्टॉप, रामनगर, इंदिरानगर व आठवडी बाजाराजवळील दीक्षित तलाव परिसराचा समावेश आहे.
विसर्जनाचे नियम
हायकोर्टाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करणे बंधनकारक आहे. यासाठी आवश्यक ती सोय स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.
निर्माल्याकरिता निर्मल कलश
गणेश विसर्जनावेळी तयार होणारे निर्माल्य थेट नदी-तलावात न टाकता, नगर परिषदेकडून उभारलेल्या निर्मल कलशात जमा करायचे आहे. जमा झालेल्या निर्माल्याचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात पुनर्वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.
स्वच्छता आणि प्रकाशयोजना
तलाव परिसरातील स्वच्छता करून इकिर्निया वनस्पती काढण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीसाठी लाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना विसर्जनाच्या वेळी अधिक सोय होणार आहे.
नगरपरिषदेचे आवाहन
“शहरात 4 ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. या ठिकाणीच भाविकांनी गणपतींचे विसर्जन करावे. शहरात स्वच्छता राखावी,” असे आवाहन नगरपरिषद घुग्घुसचे मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांनी केले.