ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे श्री. संताजी महाराजांची जयंती संपन्न

याप्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, प्राचार्य दीपक मस्के, प्रा. खुजे सर, रजिस्टर बिसन सर कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी संस्थचे संस्थपाक पी. एस. आंबटकर यांनी सर्वप्रथम दीपप्रज्वलन केले आणि संत जगनाडे महाराज माल्यार्पण करून जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्राबद्धल मार्गदर्शन करीत, प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या संत जगनाडे महाराजांचे पटशिष्य असलेले संताजी महाराज यांचा जन्म चाकण, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनावणे असून जगनाडे या टोपण नावाने ते जास्त प्रसिद्ध झाले.

तसेच संताजी महाराज त्यावेळेचे संत हे संताजी महाराज माळकरी, टाळकरी नसुन प्रस्थापित समाज व्यवस्थेवर वार करणारे खरे वारकरी होते. तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले. संताजी महाराजांनी तैलीसिधु ” नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत वर्षांनी वर्षापर्यंत अविरत कार्य करणाऱ्या लढवय्या संताजीला तेली समाज म्हणूनच जनतेवर निस्वार्थ प्रेम करणारा आणि तुकाराम महाराज सारख्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारा दैवत मानतो असे विचार व्यक्त केले.

महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते, कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले तसेच त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते, तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली.

या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये