ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील जनता शिक्षण महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

चांदा ब्लास्ट

स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे १ व २ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक एड्स दिनाच्या निमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.

१ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयात निबंध स्पर्धा व २ डिसेंबर ला पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पोस्टर मधून एड्स विषयी समाजात असलेल्या गैरसमज कसे दूर करता येतील तसेच एड्स चा प्रतिबंध, जागरूकता, संभाव्य धोके याविषयी रेखांकन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, डॉ. जी. के. पेटकर, प्रा. डॉ. राजेश पत्तीवार, डॉ. शिवराम सातपूते, ग्रंथपाल, प्रा. विजय मालेकर शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये