ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रवादी नगर येथे शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मतदार संघातील विविध ठिकाणी महिला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केल्या जात असून राष्ट्रवादी नगर येथील शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

  यावेळी  साईआईटीआई चे प्राचार्य राजेश पोशेट्टीवार, यंग चांदा ब्रिगेड बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, हलबा समाज महिला शहर प्रमुख दुर्गा वैरागडे, अल्पसंख्याक विभाग महिला शहर अध्यक्ष कौसर खान, युवत्ती प्रमुख भाग्यश्री हाडे, शांता धांडे, ममता रामटेक, फैशन डिजाइनर प्रियंका सज्जानवर, गणेश महल्ले, मयूर भोई, विमल कातकर, आशा देशमुख, नंदा पंधरे ,शमा काजी, वंदना हजारे, वंदना पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

       गरजु होतकरु महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान शिलाई कामाची आवड असलेल्या होतकरु महिलांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरात शिवणकामाचे निशुल्क प्रशिक्षण दिल्या जात आहे. स्वावलंबी नगर, बिनबा गेट, पठाणूरा वार्ड या नंतर आता राष्ट्रवादी नगर येथे सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण केंद्र महिनाभर चालणार आहे. येथे शिलाई, कपडा कापणे, फॅशन डिजाईन आदी प्रकार शिकविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात सध्या शेकडो महिलांना प्रशिक्षण दिल्या जात असुन प्रशिक्षण प्राप्त महिलांना शासनाच्या शिलाईकाम संदर्भातल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने प्रयत्न केल्या  जाणार आहे.

        दरम्यान या प्रशिक्षण शिबिराचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर प्रशिक्षण शिबिरातून महिलांनी प्रशिक्षीत व्हावे. यातून त्यांनी स्वतःचा रोजगार उभारावा, यंग चांदा ब्रिगेड ही सामजिक क्षेत्रात काम करणारी संघटना असून या संघटनेच्या वतीने विविध उपक्रम आम्ही राबवित असतो. या उपक्रमातून सर्व सामान्यांना लाभ होइल याचे नियोजन संघटनेच्या वतीने केल्या जात आहे. सध्या आपण स्वयंरोजगारातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. या करिता महागडे असलेले विविध प्रशिक्षण आपण निशुल्क उपलब्ध करुन देत आहोत. आज राष्ट्रवादी नगर येथील शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले आहे. येथे पूढील एक महिना आपण शिवणकाम संदर्भातील प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. आपण येथे उत्तमरित्या प्रशिक्षीत होत स्वताचा व्यवसाय सुरु करावा असे आवाहण या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थींसह स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये