ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता शिक्षण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन संपन्न

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते

चांदा ब्लास्ट

जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिन चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना भावपूर्ण मौन आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. के. पेटकर हे होते. त्यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माता डॉ. भीमराव आंबेडकर हे थोर समाज सुधारक, कायदेपंडीत व विद्वान होते. त्यानी संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या उन्नती साठी समर्पित केले होते. असे आपल्या भाषणातून सांगीतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेश पत्तीवार, डॉ. शिवराम सातपूते, प्रा. विजय मालेकर शिक्षकेत्तर कर्मचारी राजेंद्र जुमडे, राजु चामाटे, बालाजी जिवतोडे, सुनिल मुसळे तसेच इतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवराम सातपूते यानी केले. सुत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी तिलकराम चांदेकर यांनी केले व आभार प्रदर्शन कुमारी कविता रामटेके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये