ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्वांच्या कार्या द्वारे विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज 6 डिसेम्बर रोजी घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महात्मा गांधी जुनिअर कॉलेज गडचांदूर येथे राबविण्यात आला. या कार्यक्रमात आग कशी लागू शकते, लागल्यास त्या पासून काय हानी होऊ शकते व त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे प्रत्यक्षिका द्वारे माणिकगड सिमेंट वर्क्सच्या विभागाने शाळेतील एकूण 700 विध्यार्थी आणि शिक्षकांना समजवून सांगितले. प्रत्यक्षिकात आग लागल्यावर्ती अग्निरोधक कसे वापरावे हे विध्यार्थी व शिक्षक वर्ग याना समजवून सांगितले. कार्यक्रमा दरम्यान मुलांना प्रश्न विचारण्यात आले आणि विध्यार्थ्यांना पुरस्कृत सुद्धा केलेत.
या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य ,स्मिता चिताडे मॅडम, उप प्राचार्य माहुरे सर तसेच माणिकगढ संघ आणि शाळेतील शिक्षक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमांक वेळी प्राचार्य चिताडे मॅडम यांनी बोलतांना म्हटले कि हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून या पासून आम्हाला व विध्यार्थ्यांना घरगुती आग सुरक्षे बद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व शिक्षक वर्गानी या कार्यक्रमांची मनशोक्त प्रसंशा केली व असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे अशी विनंती सुद्धा केलीत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये