ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालडोह शाळेत महापरिनिर्वाण दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पालडोह जिल्ह्यातील ३६५ दिवस चालणारी शाळा अशी ओळख असलेल्या या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. आज या शाळेत महापरिनिर्वाण दिन याचे औचित्य साधून बालसभा पार पडली.महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता ६ वी च्या मुलांना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिले.मुलानी नियोजनबध्द काम करत ही बालसभा शाळेत आयोजित केली.

प्रसंगी शाळेतील मंत्रिमंडळ यांना पुढाकार देऊन या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्यमंत्री कु दिव्यांका बाजगिर व उदघाटक उपमुख्यमंत्री सुरज कणकावरे याला दिले.तर प्रमुख पाहुणे सांस्कृतिक मंत्री,आरोग्य मंत्री,स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री, धान्यपुरवठा मंत्री,क्रीडा मंत्री यांनी स्थान ग्रहण करत बालसभा पार पडली.

    जिल्हा परिषद पालडोह येथील महापरिनिर्वाण दिन साजरा करत राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती देत १ ली ते ८ वी च्या ४५ मुलानी मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतून मार्गदर्शन केले. लहान मुलांनी व्यासपीठावर येऊन सुंदर रित्या माहिती सांगत स्वतःचा आत्मविश्वास वाढवत मार्गदर्शन केले.

    शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी मुलांना या कार्यक्रमाचे नियोजन सोपवून ही बालसभा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. सर्वात शेवटी मुलांना मार्गदर्शन करत या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक परतेकी यांनी केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ६ वी च्या कु कावेरी राउत्तवाड व राणी राऊत यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये