ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. लालगुडा शाळेचे शैक्षणिक साहित्य विज्ञान प्रदर्शनीत ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

         शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधन विषयक दृष्टिकोन वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर च्या वतीने दरवर्षी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज गडचांदूर येथे कोरपना पंचायत समिती अंतर्गत 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी नुकतीच संपन्न झाली.

         या विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विषयक उपकरणाच्या सादरीकरणा सोबतच अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्याचे ही प्रदर्शन मांडण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील प्रयोगशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी “ज्ञानरचनावादाची धरू कास ,करू गुणवत्ता विकास “यावर आधारित स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण केले . या शैक्षणिक साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षण देणे , कृतीतून शिक्षण देणे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित,अध्ययन निष्पत्ती पूरक साहित्य आणि अल्प खर्च,सोपे व सुलभ साहित्य होते. या शैक्षणिक साहित्याने सर्व विद्यार्थी ,पालक आणि शिक्षकांची मने जिंकली.

          यावेळी पंचायत समिती कोरपना येथील गटविकास अधिकारी विजय पेंदाम, गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये