ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे

चांदा ब्लास्ट

वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

यावेळी वरोरा शहर काँग्रेस अध्यक्ष तथा वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, माजी नगरसेवक राजू महाजन, काशिफ खान, अय्युब पठाण, प्रदीप घागी, बंटी बहादे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाजसुधारक, कायदेपंडित, विचारवंत होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणूनही आपले नाव इतिहासात कोरले आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढे म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करून आपण आपल्या जीवनात सामाजिक न्याय आणि समतेचा प्रसार केला पाहिजे. त्यांनी आपल्या जीवनात कधीही कोणत्याही अडथळ्यांना घाबरले नाही. त्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या जीवनात यश मिळवले. आपण त्यांच्या या विचारांचे अनुसरण करून आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये