ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा कारागृहातील बंदी-बांधव तसेच कारागृह अधिकारी कर्मचारी करीता संपुर्ण आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

सदर शिबोरामध्ये पुरुष बंदी १३१, महोला बंदी १९ व तृतीयपंथो बंदो ०१ असे एकुण १५१ बंदयांची आरोग्य तपासणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०५/०४/२०२४ रोजी वर्धा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदी-बांधव तसेच कारागृह अधिकारी कर्मचारी यांचेकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांचे मार्फत संपर्ण आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरामध्ये BP, शुगर, ECG, त्वचारोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग तज्ञ, मौखिक आरोग्य, संसर्गजन्य रोग, क्षयरोग, व्हायरल हिपॅटायटीस, मानसिक आरोग्य तपासणी, रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये वर्धा जिल्हा कारागृह येथील बंदीस्त असलेल्या बंदयाची तपासणी करण्यात आली आहे.

तसेच संशयीत रुग्ण असलेल्या बंदयावर योग्य औषधोपचार करण्यात आलेला आहे. सदर शिबोरामध्ये पुरुष बंदी १३१, महोला बंदी १९ व तृतीयपंथो बंदो ०१ असे एकुण १५१ बंदयांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी मा.डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकीत्सक, सामान्य रुग्णालय,वर्धा, डॉ. प्रवीण धमाणे, प्रशासकिय अधिकारी, सामान्य रुग्णालय, वर्धा, डॉ. अभिलाश दुधेकर, रुग्णालय व्यवस्थापक, सामान्य रुग्णालय, वर्धा, डॉ. माधुरी निमसटकर, जिल्ह कार्यक्रम व्यवस्थापक, सामान्य रुग्णालय, वर्धा, डॉ. खुवनानी, एगडी मेडीसीन, डॉ. लोहवे, जनरल सर्जन, डॉ श्रध्या मनपे, ईएनटी तज्ञ, डॉ. मोहिता कोडापे, दंत शल्य चिकित्सक, डॉ सोनम देशमुख, त्वचारोग तज्ञ, डॉ. प्रियंका गुंड, नेत्ररोग तज्ञ, डॉ. सुदर्शन हरले, मानसिक रोग तज्ञ, डॉ. वैभव गिरडे, अस्थिरोग तज्ञ, डॉ. शुभव सराव, अस्थरोग तज्ञ, कृष्णा ताटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सर्व सामान्य रुग्णालय, वर्धा तसेच तंबाखु नियंत्रण विभाग चमु, मलेरिया तपासणी चमु, कुष्ठरोग तपासणी चम्. क्षयरोग तपासणी चमु, रक्त तपासणी चमु हिंद महालॅब. सामान्य रुग्णालय, वर्धा तसेच करागृह अधीक्षक, श्री.एस.आर. पवार, कारागृह वैद्यकिय अधिकारी श्रीमती डॉ. रश्मी गोडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, नितीन क्षिरसागर, तुरुंगाधिकारी  जितेंद्र भावसार, शिपाई अमित कोठारकर, अतुल जाधव, आशुतोष बोन्डे, लोकेश ठाकरे, ईत्यादी कारागृह कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये