Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी दिली स्त्री आधार केंद्र ला भेट

निराधार महिलांना आश्रय देण्याविषयी जाणून घेतले कार्य

चांदा ब्लास्ट

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी स्त्री आधार केंद्र संस्थेला एक्सप्लोझर भेट दिली.

सरस्वती महिला शिक्षण मंडळ, मुल रोड, चंद्रपूर संचालित स्त्री आधार केंद्र मागील अनेक वर्षांपासून निराधार महिलांना आधार, आश्रय, समुदेशन, वैद्यकिय, कायदेविषयक सुविधा देण्याचे कार्य करत आहे. आपण समाजामध्ये बघतो की स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्या जाते. स्त्रियांवर अत्याचार होताना दिसत आहे. त्यांचा छळ केला जातो. त्याच प्रकारे वैवाहिक समस्या, कुमारी माता प्रकरण, अनैतिक व्यवहारातून असलेल्या महिला, कौटुंबिक समस्याग्रस्त असलेल्या महिला यांना या संस्थे मध्ये आश्रय दिल्या जातो व त्यांचे पुनर्वसन केल्या जाते. यावेळी संस्थेचे समन्वयक घनश्याम कामटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेश क्षीरसागर, वन स्टॉप सेंटर च्या केंद्रप्रमुख कल्याणी रायपूरे यांनी संस्थे विषयी माहिती दिली.

संस्था भेट समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन हर्षाली खारकर, आभार स्वप्नील मेश्राम यांनी व्यक्त केले

.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये