मतदार यादी निरीक्षक तथा नागपूरच्या विभागीय आयुक्त २८ नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षकांच्या जिल्हानिहाय तीन भेटींचे आयोजन

चांदा ब्लास्ट
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षकांच्या जिल्हानिहाय तीन भेटींचे आयोजन असून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट, दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत दुसरी भेट आणि मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत तिसरी भेट आयोजित आहे.
त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे २८ नोव्हेंबर २०२३ रोजी १२.१५ वाजता वीस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधींची बैठक आयेाजित करण्यात आली आहे, असे प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.