ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मुल येथे आरोग्य सेवेचे विशेष आयोजन

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे भव्य आरोग्य शिबिर

चांदा ब्लास्ट

सर्व वयोगटातील मातृशक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

महिलांसाठी सर्व आजाराची मोफत तपासणी, उपचार, पोषण आहार मार्गदर्शन व आरोग्य संदर्भात शासनाच्या सर्व योजनाचा लाभ मिळण्यासदर्भात माहिती

मुल : देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा पंधरवडा” अभियानांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. महिलांच्या निरोगी आरोग्य संवर्धनासाठी या शिबिरात विशेष आरोग्य तपासणी, पोषण मार्गदर्शन, रक्त तपासणी तसेच सिकल सेल,थॅलेसिमिया निदान यांसारख्या सेवा उपलब्ध राहणार आहेत.या भव्य शिबिराचा सर्व वयोगटातील मातृशक्तींनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या शिबिराचा उद्देश महिलांच्या सर्वांगीण आरोग्य संवर्धनासोबतच पोषण आणि निरोगी जीवनशैलीबाबत व्यापक जनजागृती करणे हा आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, अनिमिया, क्षयरोग, स्त्रीरोग यांसारख्या आजारांचे निदान केले जाणार आहे. गर्भवती महिलांची विशेष तपासणी, रक्त तपासणी, सिकल सेल तपासणी तसेच मुलींना आरोग्यविषयक मोफत सल्ला दिला जाणार आहे. महिलांसाठी माता व बालसुरक्षा कार्ड, आयुष्मान भारत योजनेचा लाभ, पोषणपूरक आहार मार्गदर्शन आणि निरोगी आरोग्याबाबत आवश्यक माहिती या शिबिरात उपलब्ध होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन आ. सुधीर मुनगंटीवार स्वतः करणार असून, मातृशक्तीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधार कार्ड, आभा कार्ड तसेच PMJAY कार्ड सोबत आणावे, असेही आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये