ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होमिओपॅथिक डाॅक्टर्स असोसिएशनचे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहीर

डॉ. अमरसिंह गौतम, डॉ. बाळासाहेब महानोर, नंदकिशोर देशपांडे यांचा समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    होमिओपॅथिक डाॅक्टर्स असोसिएशनने जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधून होमिओतपस्वी दिवंगत डॉ. अजय ढगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय होमिओपॅथिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. १२ एप्रिल रोजी बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

         असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे की होमिओतपस्वी दिवंगत डॉ. अजय ढगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून होमिओपॅथीच्या क्षेत्रात उल्लेखनीय व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या जेष्ठ होमिओतज्ञांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी मुंबई, उल्हासनगर येथील प्रसिद्ध होमिओतज्ञ तथा संशोधन कार्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. अमरसिंह गौतम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेडा या छोट्याशा गावात राहून ग्रामीण भागात होमिओपॅथीद्वारे अनेक दुर्धर आजारावर यशस्वी उपचार करणारे डॉ. बाळासाहेब ना. महानोर, डेबको या संस्थेमार्फत होमिओपॅथीची औषधी निर्माण करुन भारतभर सेवा देत असलेले नंदकिशोर देशपांडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. १२ एप्रिल रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय परीसरात आयोजित जागतिक होमिओपॅथी दिन कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याहस्ते सदर पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

           पुरस्कार वितरण समारंभाला जिल्ह्यातील सर्व होमिओतज्ञांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बुलढाणा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दुर्गासिंग जाधव, उपाध्यक्ष डॉ. स्वाती मसने, सचिव डॉ. सागर जोशी, सहसचिव डॉ. पल्लवी जोशी, कोषाध्यक्ष डॉ. पवन बजाज, सहकोषाध्यक्ष डॉ. दीपक बडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये