Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कंपनी विरोधात सरपंच संघटनेचे आंदोलन

जिल्हा सचिव रत्नाकर चटप व उपसरपंच बालकृष्ण काकडे बसले उपोषणाला

चांदा ब्लास्ट

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपूर या कंपनीच्या विरोधात या कंपनी क्षेत्रातील दहा गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू होते. आज अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप व आवारपूर  ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाची कंपनीने दखल न घेतल्याने अखेर बेमुदत आंदोलन सुरू झाल्याने आता हे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
              दिनांक 13 नोव्हेंबर पासून दत्तक गाव सरपंच संघटनेचे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात साखळी उपोषण सुरू होते. मात्र तोडगा निघालेला नसल्याने शेवटी सरपंच संघटनेने आमरण उपोषणाचा  सुरू केले. कंपनी अंतर्गत येत असलेल्या नांदा, बीबी, आवरपुर, सांगोडा  हिरापूर, भोयेगाव, तळोदी, बाखर्डी, नोकारी या गावांसाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी मोठ्या प्रमाणात खर्च करावा, पांदण रस्त्याचे बांधकाम करावे, लाइम स्टोनची वाहतूक थांबबावी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अप्रेंटिस साठी संधी द्यावी, गावातील स्थानिक शिक्षक बेरोजगारांना रोजगार द्यावा इत्यादी मागण्या उपोषणकर्त्यांनी कंपनी समोर ठेवलेल्या आहेत.
सदर समस्यांचा तात्काळ तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दत्तक गाव सरपंच संघटना व अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिला आहे. या उपोषणात बीबी येथील उपसरपंच आशिष देरकर, नांदा सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच  पुरूषोत्तम आस्वले, आवारपूर सरपंच प्रियंका दिवे, हिरापूर सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, सांगोडा सरपंच संजना बोंडे, भोयेगाव सरपंच शालिनी बोंडे, तळोदी सरपंच ज्योती जेनेकर, बाखरडी सरपंच अरुण रागीट, नोकरी सरपंच संगीता मडावी यांचेसह सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
            या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी भेट देऊन शेतकरी संघटनेचा पाठींबा व्यक्त करीत ग्रामपंचायतच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण आंदोलकांसोबत असल्याचे सांगितले.
           गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतांना अद्याप कोणत्याही प्रशासकिय अधिका-याने या आंदोलनाची नोंद घेतली नाही. प्रशासनही औद्योगिक क्षेत्रातील रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल या भागातील नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सरपंच संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये