ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेद संघटनेचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

उमेद संघटना महिला विकासाकरीता कटीबदध-राज्याध्यक्ष लाटकर

चांदा ब्लास्ट

दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी स्थानिक आशीर्वाद सभागृह येथे उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी व महिला कल्याणकारी असोशिएशनचा स्नेहमिलन सोहळा पार पडला. सुमारे 2 हजार सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सोहळ्याच्या उदघाटक म्हणून राज्याध्यक्ष चेतना लाटकर, अध्यक्षस्थानी राज्य प्रतिनिधी गजानन ताजने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला कार्यकारीणीच्या राज्याध्यक्षा रुपाली नाकाडे, उपाध्यक्ष नवनाथ पवार, मार्गदर्शक प्रभाकर गावडे, निरज नखाते, जिल्हाध्यक्ष प्रवीण भांडारकर, महिला कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष शिल्पा भोसकर उपस्थित होते.
सोहळ्याची भूमिका जिल्हाध्यक्ष प्रवीण भांडारकर यांनी मांडली. संघटनेच्या वतीने सर्व ५५ प्रभागसंघाच्या अध्यक्षांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच 6 महिलांचा विशेष कार्यगौरव करण्यात आला. सोहळयात मूल येथील आरिफा भसारकर यांनी आपल्या मनोगतात अभियानातून प्रत्येक कुटुंबाची उपजिविका वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अनेकांना लाभ होत असल्याचे मत व्यक्त केले.
तर पोंभुर्णा येथील प्रभागसंघ अध्यक्ष पोरेटी यांनी प्रभागसंघांना आणखी गतीने काम करण्याची गरज असून, वित्तीय संस्था आणखी बळकट व्हाव्यात, असे मत मांडले. उद्घाटक राज्याध्यक्षा चेतना लाटकर अध्यक्ष यांनी संघटनेची निर्मिती केवळ हक्क मिळविण्यासाठी नव्हे, तर महिलांच्या विकासात सहायकारी संस्था म्हणून झाल्याचे सांगितले. विविध संस्था, शासकिय कार्यालये, तसेच सरकारी धोरणे यात महत्वाची जबाबदारी पुर्ण करण्यासाठी आता सदस्यांनी सज्ज झाले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. रुपाली ताई नाकाडे  यांनी  संघटना मजबूत करण्यासाठी  उपस्थित कर्मचारी व प्रेरीकाना  मार्गदर्शन केले. प्रभाकर गावडे यांनी अभियानातील प्रत्येक सदस्यांच्या कुटुंबांमधील उत्पन्न वाढले पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन ताजने यांनी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांनी उपजिविका साधने वाढविण्याकरीता एकजुटीने समोर यावे,असे आवाहन केले. निरज नखाते यांनीही मार्गदर्शन केले.
संचालन प्रभाग समन्वयक बंडू लेनगुरे यांनी, तर आभार नरेंद्र नगराळे यांनी मानले. आयोजनासाठी सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये