चांदाब्लास्ट विशेष

*मौजा लोणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रध्दांजली

गावात प्रभातफेरी मार्गावर रस्त्यांवर व नागरिकांनी घरांभोवती रांगोळी काढुन परिसर स्वच्छ व सुंदर केला

चांदा ब्लास्ट: प्रमोद गीरडकर:

कोरपणा:-
येथुन जवळच असलेल्या मौजा लोणी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्य गावकऱ्यांकडुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
गावात दिंडी व्दारा प्रभातफेरी काढण्यात आली.पदावली भजण मंडळाने तुकडोजी महारांचे भजणाने त्यांना वंदन केले.
संपुर्ण गावात प्रभातफेरी मार्गावर रस्त्यांवर व नागरिकांनी घरांभोवती रांगोळी काढुन परिसर स्वच्छ व सुंदर केला होता.

कार्यक्रमाची सांगता तुकडोजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतऴ्या ची पुजा करूण त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती.
यावेळी गावचे पुलिस पाटिल एकनाथ वडस्कर,संजय पिंपळशेंडे,मारोती मुसळे,सुभाष वडस्कर,घनश्याम नांदेकर,सतिश मुसळे,सतिश काकडे,गजानन वडस्कर,तुकाराम कोटनाके,तुळशिराम लेनगुरे,माधव आदे,विनोद भोंगळे,हिराजी डाखरे,संगिता थेरे,शोभा आदे,मिराबाई लेनगुरे यांचेसह गावातिल मातृशक्ती व बालगोपाल नागरिक उपस्थित होते।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button