ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न

१३० नागरिकांनी घेतला नेत्ररोग तपासणी शिबीराचा लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        डोळ्यांची विशेष काळजी नाही तर जन्मभराचे अंधत्व : डॉ. गुंजन इंगळे ( कांबळे )

डोळे हा मानवी देहाचा महत्त्वाचा अवयव आहे. त्याची निगा व काळजी आपल्याला स्वतःलाच व्यक्तीश: घ्यावी लागते. डोळ्यांची विशेष काळजी घेतली नाही तर प्रसंगी जन्मभराचे अंधत्वही येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपल्या डोळ्यांची योग्य पद्धतीने निगा राखली पाहिजे व डोळ्याचे संरक्षण केले पाहिजे असे विचार चंद्रपूर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. गुंजन इंगळे (कांबळे) यांनी व्यक्त केले. त्या स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात युगपुरुष स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक – मित्र मंडळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती तथा विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डोळ्यांची काळजी व निःशुल्क नेत्र चिकित्सा शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

नेत्ररोग तपासणी शिबीराचा १३० नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरात नागरिकांना तपासणी नंतर आध्यवी नेत्रालय, चंद्रपूर तर्फे आवश्यक अशा रुग्णांना डोळ्याचे ड्रॉप्स मोफत देण्यात आले. ज्यांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करायची गरज आहे त्यांना चंद्रपुर येथील आध्यवी नेत्रालयामध्ये सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सोबत ज्या रुग्णांना चश्मा बनवायचा आहे त्यांना एस. आर. ऑप्टिकल भद्रावती यांचे कडुन २५% सवलत देणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामिण रूग्नालय भद्रावती यांचे कडुन १४ लोकांचे आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचे कार्ड काढण्यात आले. तसेच सर्व रूग्नांची मधुमेह आणि रक्तदाब तपासणी सुद्धा करण्यात आली.

यावेळी अध्यक्षस्थानी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक – मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते, ग्राहक पंचायत चे अध्यक्ष वामन नामपल्लीवार, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे सचिव माधव कवरासे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उमाटे, आभार चंपत आस्वले यांनी केले.

विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेन्ट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या शिबिराचे यशस्वीतेसाठी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी प्रवीण चिमूरकर, वसंत वऱ्हाटे, सुदर्शन तनगुलवार, विठ्ठल मांडवकर, अण्णाजी कुटेमाटे, डॉ.रमेश पारेलवार, प्रा.अमोल ठाकरे, डॉ.उत्तम घोसरे, ग्रामिण रूग्णालय भद्रावतीचे अधिक्षक मनिष सिंग, श्र्वेता कांचर्लावार, वैशाली सुर्यवंशी, सुभाष यादव, डॉ. यशवंत घुमे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये