ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हृदयद्रावक घटना – नालीत मृतावस्थेत आढळले नवजात अर्भक

चिमूर तालुक्यातील बोडधा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

चिमूर – मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी 1 नोव्हेंबर ला सायंकाळी चारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील बोडधा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून  गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते. ती बालिका असुन पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे. कुणातरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्रीच नालीत आणुन टाकले असावे,

अशीही चर्चा आहे. आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे, अशीही शंका व्यक्त केली आहे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये