आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार जाहीर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२६ व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांच्या वतीने १७ मार्च ला नगर मानखुर्द येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, महिला सन्मान मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे.
त्याच दिनाचे औचित्य साधून आणि माता रमाईच्या १२६ व्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या १२६ स्त्रियांचा मान सन्मान करणार आहेत. यामध्ये आदर्श माता शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांचा समावेश आहे,तरी महिला वर्गाने मोठया संख्येने उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास आणि माता रमाईच्या जीवनाला अभिवादन करुन त्यांच्या जीवनावर उजेड टाकण्यात आपला खारीचा वाटा उचलावा.असे आवाहन आयोजक- मुंबई महाराष्ट्रातील आंबेडकरी युवक विकी शिंगारे…यांनी केले आहे.