ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजरी येथे २१ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत भव्य शिवशक्ती  दांडिया उत्सवाचे आयोजन

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा महिला - भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक  उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     सर्वत्र नवरात्री उत्सव साजरा होत आहे. यानिमित्य स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांच्या संकल्पनेतून महिला – भगिनिंसाठी कला व सांस्कृतिक  उपक्रमांतर्गत तालुक्यातील माजरी कॉलरी  येथील शिव – पार्वतीश्वर मंदिर, सबएरिया कार्यालयासमोर दि.२१ ते २३ ऑक्टोंबर दररोज सायंकाळी सहा वाजता  या कालावधीत भव्य शिवशक्ती दांडिया उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

      माजरी परीसरातील माता, महिला व भगिनींनी  या  उत्सवात फारमोठ्या संख्येत सहभागी होऊन आनंद घ्यावा. असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले तसेच उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष रविशंकर रॉय व कार्याध्यक्ष रवि भोगे यांनी संयुक्तपणे केले आहे. उत्सवात सहभाग घेण्यास उत्सुक असणाऱ्या  माता, महिला व भगिनींनी  अधिक माहिती घेण्यासाठी गायत्री यामलवार, वीण बहादे, मधु सिंग, उषा परमार, वनिता मानुसमारे, दिपीका मानुसमारे, कांक्षीनी निशाने, सुनीता गौतम प्रसाद, बेबी चांदेकर, वैशाली पिंपळकर, रुचिता ढगे आणि अश्विनी कोहळे यांच्याशी संपर्क साधावा. असेही आवाहन उत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

       स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या संयोजनात  माजरी येथील पंडित जवाहरलाल  नेहरु क्लब येथे दि. १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत दररोज दुपारी बारा ते  तीन वाजेपर्यंत नवरात्र उत्सवात सादर करण्यात येणाऱ्या  युवती व महिलांच्या  दांडिया व गरबा नृत्यप्रकाराचे   निशुल्क प्रशिक्षण शिबिर सुध्दा  आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात माजरी परिसरातील दहा ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील दांडिया व गरबा नृत्यप्रेमी सहभागी होत आहे. या शिबिराला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे  सिनेतरिका व पारितोषीक विजेता नृत्यगंणा झाडीपट्टी कलाकार ज्योति रामावार यांच्या मार्फत सदर प्रशिक्षण दिल्याजात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये