Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जमाफी करिता शेतकऱ्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय निकाली काढणार., राज ठाकरे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०१७ साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी झाली खरी पण त्यात चंद्रपूर जिल्हयातील किमान ३० हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफी पासून वंचित केल्याने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून अनेक वेळा आंदोलन केले.

वरोरा येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांच्या पुढाकाराने ठिय्या आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले पण तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात शासनाने कुठलेही पाऊल टाकले नाही, दरम्यान तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ ला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नव्याने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु त्या संदर्भात कुठलाही आजपर्यंत अध्यादेश काढला गेला नाही त्यामुळे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथील त्यांच्या शिवतीर्थ निवास्थानी दिनांक १२ आक्टोबर २०२३ ला भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तुम्हचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. यावेळी मनसे नेते राजु उंबरकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. पीयूष धुपे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांना शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना २०१७” या नावाने तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबवली होती. त्या कर्जमाफी योजनेत जे शेतकरी पात्र होते पण तांत्रिक अडचणीमुळे व सरकारने त्यावेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने निधीअभावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. दरम्यान सन २०१८ पासून सतत कर्जमाफी पासून वंचित शेतकन्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यांना आजपर्यंत कर्जमाफी मिळाली. नाही, एव्हाना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी राबविलेल्या ‘महात्मा फुले कर्जमाफी’ योजनेतून सुद्धा जाणीवपूर्वक या पात्र शेतकऱ्यांना डावलण्यात आले होते.

शेतकन्यांच्या कर्जमाफी करिता महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांनी वेळोवळी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तथा आताचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदने दिली व वरोरा तहसील कार्यालयासमोर वारंवार धरणे आंदोलन केले पण सरकारला याबाबत जणू काहीच घेनेदेने नाही अशी गंभीर परिस्थिती असुन आता शेतकन्यांना शेतीच्या हंगामात बियाणे व खते घेण्यासाठी नव्याने कर्ज द्यायला बैंक तयार नसून उलट शेतकर्यांवर कर्जाचा बोझा वाढत आहे व शेतकन्यांची बैंक खाती गोठवून त्यांचे स्वतःचे बँकमध्ये विविध योजनेअंतर्गत आलेले पैसे पण त्यांना काढता येतं नाही त्यामुळे शेती करायची कशी? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे सावकारांकडे कर्ज मागण्याची व त्यासाठी शेती गहाण ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ ला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व्याने सुरू करण्यात येईल. आणि ज्या ज्या शेतकन्यांना २०१७ च्या कर्जमाफी मध्ये लाभ मिळाला नव्हता अश्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा केली होती, पण या संदर्भात सरकारचा वेळकाढूपणा सुरु असुन या संदर्भात औरंगाबाद खंडपीठानं सुद्धा कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ सरकारने कर्जमाफी द्यावी असा आदेश सन २०२२ मध्ये दिला आहे.

 

पण, सरकार हे ऐकून घ्यायला तयार नाही. दरम्यान कर्जमाफी न मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५८० शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ देण्याचे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधिमंडळात दिले आहे तर मग चंद्रपूर जिल्हयातील वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील १५०० शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार का टाळाटाळ करीत आहे असा शेतकन्याचा सवाल असून समजा शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर पुन्हा नव्याने कर्ज पण मिळणार नाही व अगोदरच सावकाराकडून कर्ज घेण्याची पाळी सरकारने शेतकऱ्यांवर आणल्याने त्यांच्या गहाण ठेवलेल्या जमिनी काही वर्षात सावकाराच्या घशात जाईल त्यामुळे युतीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी राबविण्यात आली.

त्यामधील वंचित शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व शेतकन्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली त्या शेतकऱ्यांना जीवनदान द्यावे अशी मागणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये