ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. अशोक गुप्ता सर्वोत्कृष्ट शिक्षणतज्ञ म्हणून शिक्षण मंत्री च्या हस्ते सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 मेस्ता, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी ऑर्गनायझेशनतर्फे मुंबईतील लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे चर्चा सत्र, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक, शाळेचे विश्वस्त आणि पुरस्कार विजेते शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम चे सादरीकरण करणारे विद्यार्थी या दोन्ही दिवशी कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी मराठी सिने अभिनेत्री निशिगंधा वाड उपस्थित होत्या , शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, मंत्री सचिन अहिर उपस्थित होते.या प्रसंगी मेस्टा अध्यक्ष डॉ.संजय पाटील तायडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये येणाऱ्या समस्यांवर चर्चा करून माहिती दिली. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर हे उपस्थित होते.

त्यांनी विश्वस्तांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या अडथळ्यांवर मात कशी करता येईल यावर आपले विचार मांडले व इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये निर्माण होणार्‍या अडचणी लवकरच सोडवू असे आश्वासन दिले.यामध्ये श्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही विश्वस्तांचा गौरव करण्यात आला.मुंबई येथील इंद्रा इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.अशोक बी. गुप्ता यांना उत्कृष्ट शिक्षणतज्ञ असा बहुमान प्रदान करण्यात आला.हा सन्मान प्राप्त होताच शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून डॉ.गुप्ता यांचे हितचिंतक व पत्रकार जगतातील मित्रांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये