ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ट्रॅक्टरने धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू
बरांज- तांडा रस्त्यावरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती -चंदनखेडा मार्गावर बरांज तांड्याजवळ दुचाकीने जाणाऱ्या शिक्षकाला ट्रॅक्टर चालकाने मागाउन धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारला घडली या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सुनील गोविंद बरडे राहणार भद्रावती असे मृतक शिक्षकाचे नाव आहे ते घमाबाई प्राथमिक आश्रम शाळा बरांज तांडा येथे शिक्षक होते ते आपल्या मोटरसायकलने भद्रावतीकडे येत असताना मागवून येणाऱ्या एम एच ३४ ऐ आर६१५८ या ट्रॅक्टरने धडक दिली यात शिक्षकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी ट्रॅक्टर चालक आरोपी सोनू पोतराजे वय ३० वर्ष राहणार बोंथाळा याला अटक केली असून पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहे