ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूर राज्यस्तरीय स्पर्धेत शिवराज मालवी यांचे घवघवीत यश

एकुण 4 पदकं प्राप्त 1 सुवर्ण,1 रजत तर 2 कांस्य पदक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

महाराष्ट्र स्टेट व्हेटरन्स अक्वेटिक असोसिएशन आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मास्टर्स अक्वेटिक स्विमर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 24 वी राज्यस्तरीय प्रौढ जलतरण स्पर्धा दिनांक 1 व 2 आक्टोबरला सागर पाटील जलतरण तलाव,शाहु काॅलेज कदमवाडी, कोल्हापूर येथे आयोजित केली होती.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन जवळपास 400 जलतरणपटू सहभागी झाले.

स्पर्धेमध्ये चंद्रपुर जिल्ह्याचे एकमेव प्रतिनिधित्व करत ब्रम्हपुरी येथील शिवराज मालवी यांनी 60 ते 64 या वयोगटात सहभाग घेतात व 200 मीटर आय एम मध्ये सुवर्ण पदक,100 मीटर फ्रिस्टाइल मध्ये रजत पदक,200 मीटर फ्रिस्टाइल मध्ये कांस्य पदक तर 100 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये कांस्य पदक मिळवत एकुण 1 सुवर्ण,1 रजत, व 2 कांस्य असे 4 पदकं प्राप्त करत ब्रम्हपुरी व चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर पोहचविले.

असे अभुतपूर्व यश संपादन करण्यासाठी त्यांचे डोंगेघाट येथील नियमित सराव महत्वपूर्ण राहीले या यशाबद्दल त्यांचे सहकारी व मित्र मंडळी यांचे कडून अभिनंदन होत आहे तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये