ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वास्तु संग्रहालय उलगडणार भद्रावतीचा पुरातन इतिहास

पुरातन वास्तु संग्रहालयाचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण ; भद्रावती नगर परिषदेने दिला 23 लाखाचा निधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नगरपरिषद निधीतून हुतात्मा स्मारक येथे भद्रावती पुरातन वास्तु संग्रहालय उभारण्यात आले. या संग्रहालयाचे नुकतेच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, उपअभियंता रविशंकर गुप्ता आधी उपस्थित होते. भद्रावती शहराचा ७०० विहीरी ,७०० तलाव ७०० देऊळ् असल्याचा पुरातन इतिहास आहे. या शहराच्या मध्यभागी यवनाश्व राज्याचा किल्ला आहे. त्यामुळे या शहरात कुठेही खोदकाम केल्यावर निरनिराळ्या मुर्त्या विविध वास्तू आढळत असतात.

अशा ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे याकरता नगराध्यक्षांनी धानारकर यांच्या पुढाकाराने नगरपरिषद फंडातून २३ लाख खर्च करून पुरातन वास्तु संग्रहालय उभारण्यात आले या संग्रहालयाचे नुकतेच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

भद्रावती शहरातील परिसरात पुरातन वास्तु विविध मूर्त्या नागरिकांना आढळल्यास त्यांनी नगर परिषद मध्ये संपर्क साधून संग्रहालयात जमा करण्यात यावे असे आव्हान नगराध्यक्ष अनिल धानोकर यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये