ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टराविना प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू

तब्बल ११ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

तालुक्यातील अंदाजे तब्बल २ हजार लोकसंख्या असलेल्या जीबगांव येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु, आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरसहित  अनेक पदे रिक्त असल्याने डॉक्टर विना आरोग्यसेवा कोलमडली आहे. त्यामुळे तब्बल ११ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११  गावांचा कारभार चालतो. सावली,सावली,खेडी व कवठी अशी चार उपकेंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला एक एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी होते. त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनि पुढील शिक्षणासाठी राजीनामा दिल्याने  बी.ए. एम .एस . पुरुष वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पाहत होते मात्र ११ महिन्याचा त्यांचा बाऊणड संपला असल्याने डॉक्टर विना दवाखाना सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी असणे आवश्यक असतानाही रिक्त जागा आहे.

जिबगांव ग्रामीण परिसरामध्ये शेतकरी, सर्वसामान्यांची संख्या जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उपचार घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राशीवया आजच्या महागाईच्या काळात दुसरा पर्याय नसतो म्हणून आजच्या सर्वसामान्य जनतेची धाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे असते परंतु कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नाहक त्रास रुग्णाला सहन करावा लागत आहे सोबतच पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढत असून विविध प्रकारचे आजार डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागामध्ये गटारी साचलेल्या असतात. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. मलेरिया, डोकेदुखी, हिवताप, टायफाईड आदी आजारांचे रुग्ण वाढत आहेत. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन वेळची ओपीडी काढावी लागते. सकाळी साडेसात ते साडेबारा किवा एक वाजेपर्यंत तसेच दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण तपासणी चालते. जीबगाव मुख्य ठिकाण असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्ण नेहेमीच येत असतात त्यामुळे रिक्त असलेली पदे त्वरोत भरण्याची मागणी निवेदनाद्वारे ता आरोग्य अधिकारी यांचे मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात येवुन रिक्त पदे त्वरित भरुन रुग्णांना मोफत सेवा मीळावी करीता मागणी केली आहे

  राकेश गोलेपल्लीवार, ग्रामपंचायत सदस्य जिबगाव

अशी आहेत रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी २

आरोग्य सहा. पुरुष १

आरोग्य सेवक १

आरोग्य सेविका ३

परिचर १

रिक्त असलेली पदे भरण्या सभांधित वारिष्टकडे पाठपुरावा केलेला आहे लवकरच पदे भरण्यात येतील

तालुका आरोग्य अधिकारी सावली, डॉ. धनश्री औगड

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये