ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तालुक्यात  ‘होवू द्या चर्चा!’ उपक्रमाला जनतेचा जोरदार  प्रतिसाद

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते मनोज जामसुतकर व सुर्यकांत पाटील यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

      तालुक्यात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा मुंबईचे माजी नगरसेवक  चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक मनोज जामसुतकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात  ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात   ‘होवू द्या चर्चा!’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाला जनतेचा ठिकठिकाणी जोरदार  प्रतिसाद मिळत आहे. काल  दि. १ ऑक्टोंबर रोजी कोंढा -घोडपेठ जि.प . क्षेत्रात घोडपेठ व मोहबाळा येथे तसेच नंदोरी -कोकेवाडा जि.प. क्षेत्रात नंदोरी ( बु. ) व सागरा येथे  सदर उपक्रम आयोजित करण्यात आला. सदर उपक्रम वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.

     ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र  प्रमुख  रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या “होवू द्या चर्चा !” उपक्रमात जिल्हा महीला आघाडी प्रमुख नर्मदा दत्ता बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक वैभव डाहाने, विधानसभा सघंटक मगेश भोयर, तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल, उपजिल्हा सघंटीका माया नारळे ,तालुका महीला सघंटीका अश्लेषा जिवतोडे-भोयर , युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर आणि विभाग प्रमुख सिध्दू पेटकर यांच्यासह फार मोठया संख्येत  शिवसैनिक भद्रावती तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा!’ उपक्रमाची जनेतला माहीती देत जनसंवाद साधत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये