ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात नागरिकांनी आजच्या दिवशी एक तास स्वच्छतेसाठी देऊन आपला गाव आपले परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तारीख एक घंटा या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या 3महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन सी सी च्या कॅडेट यांच्या वतीने ब्रहापुरी येथील रेल्वस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.

त्याआधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर एनसीसी विभागाच्या 3महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन सी सी च्या कॅडेटस्नी मुख्य रस्त्याने स्वच्छतेचा संदेश देणारी लोकजागृती करणारे नारे देत रॅली काढून ब्रहापुरी येथील रेल्वस्थानक परिसर स्वच्छ करून लोकांना जागृत करण्यात आले.

सदर उपक्रम 3महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी ना आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांच्या आदेशानुसार एनसीसी ऑफिसर लेफ्ट. सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमात प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच 75 कॅसेट्स उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये