ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा स्टेडियम येथे आयोजित मनपा स्तरीय / जिल्हा स्तरीय शालेय विविध स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट

शालेय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आले, बास्केटबॉल स्पर्धेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.

         दरवर्षी प्रमाणे यंदाही मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्याना शालेय टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक घेऊन यशाची उंची गाठली आहे. १७ वर्षाखालील विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

             त्यामध्ये महेश कोठारे,अनमोल बेलेकर,गौरव मोहुर्ले,मंथन मेश्राम,अभिनव पवार,यश सूरकर,वेदांत चहारे,सुरज भुसारी,करण कुंभारे,क्रिश मूलकलवार,वेदांत गेडाम ह्या विद्यार्थ्यांनी बास्केटबॉल स्पर्धेत विभागीय संघपात्रात निवड झाली.यामध्ये स्पर्धेचे निरीक्षक ज़िल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले होते. या स्पर्धेत विजयी झालेली विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

             संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंगजी आंबटकर,उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर,तसेच शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आणि समोर आयुष्यात प्रगती करावी अश्या शुभेच्या दिल्या, क्रीडा प्रमुख शिक्षक सचिन चापले,निलेश कामडे,आल्ताफ खान यांनी परिश्रम घेतले तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये