ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्मार्ट योजनेची चंद्रपूर जिल्हयात अंमलबजावणीत आघाडी

प्रशासनाचा पुढाकार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

चंद्रपूर जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत मंजूर प्रकल्पातील कृषी विभाग,नाबार्ड माविम, उमेद यांच्यामार्फत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी सभासद करिता केंद्र व राज्य शासनाच्या जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत दहा हजार एफ पि सि निर्माण कार्य विविध विभागामार्फत गेल्या दोन-तीन वर्षापासून सुरू आहे मात्र कोरोना कालावधीमध्ये ही काम मंदावले होते.

मात्र गत एक वर्षात जिल्हा प्रकल्प अमलबजावणी कक्ष आत्मा यांच्या सातत्याने पाठपुरावा बँक शासकीय अधिकारी यंत्रणा यांच्याशी समन्वय ठेवीत प्रशिक्षण प्रबोधन व शेतकरी सभासदांच्या आर्थिक कल्याण व आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात उत्पादित होणारे पिकाचे मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यासाठी व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक नुकसान व मजूर टंचाईमुळे शेतीबद्दल असलेली उदासीनता यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा सि जि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार प्रकल्प संचालक आत्मा प्रीती हिरळकरयांनी पुढाकार घेत शेतकरी उत्पादक कंपन्याच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवणूक व्हावी म्हणून तसेच बँक क्षेत्रातील अधिकारी नाबार्ड अधिकारी यांच्या समन्वयातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्मार्ट प्रकल्प अंतर्गत साधन सामग्री कारण योजना गोदाम बांधकाम तांत्रिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून शेतकरी सभासदांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपक्रमाची कार्यशाळा घेऊन या कामांना गती देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्याशी समन्वय घालीत बांबू लागवड लेमन ग्रास बायोमास पायोनियर गवत त्याचबरोबर मोहरी लागवड इत्यादी बाबत शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी प्रयत्न होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या समोर सरसावले आहेत.

जिल्ह्यात 25 प्रकल्पांना स्मार्ट योजनेअंतर्गत प्राथमिक मंजुरी मिळाली बारा प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी प्राप्त झालीत्यापैकी ई-निविदा आर्थिक प्रक्रिया जिल्हास्तरावर राबविण्यात आली यामध्ये सहा प्रकल्पांना तातडीने मंजुरी घेऊन कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे जिल्हा अंमलबजावणी कक्ष आत्मा येथे निविदा उघडण्याची प्रक्रिया पार पडली यावेळी उपविभागीय अधिकारी नंदकिशोर घोडमारे तांत्रिक सल्लागार पि जी मादेवारव आत्माचे तांत्रिक चमू सदस्ययांचे सह शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी तथा वैनगंगा व्हॅली महासंघाचे संचालक नरेंद्र जीव तोडे आबिद अली बंडू डाखरे दिलीप फुलबांधे संतोष खडतकर इत्यादी उपस्थित होते.

साखरबाई काटन प्रकल्प नंदोरीप्रक्रिया प्रकल्प सिल्वर स्टोन ग्रेडिंग प्रक्रिया प्रकल्प गेवरा राईस मिल प्रकल्पकृषक उन्नती प्रक्रिया प्रकल्प चंदनखेडा प्रक्रिया प्रकल्पइत्यादी प्रकल्पाच्या उपक्रमांना गती देण्यात यावी प्रकल्प बांधकाम सुरू करण्यासाठी मशनरी व बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यासाठीकामाला गती द्यावी असे प्रकल्प संचालक प्रीती हिरडकरसूचना दिल्या यावेळी आबीद अली यांनी जिल्हाधिकारी समक्ष वनअधिकारी सभा आयोजित करूण वनहक्क जमीन बाबत धोरणात्मक निर्णयाची गरज व्यक्त केली तसेच यामुळे शेतकरी उत्पादक महासंघ सभासदाकरिता संलग्न एफ पिओच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना राबवण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे नरेंद्र यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये