Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

जिद्द, चिकाटी, प्रामाणिकता वेळेचे योग्य नियोजन व स्वयंशिस्त अंगीकृत करण्याची तयारी असेल तरच अधिकारी बनण्याचे स्वप्न बघा!

डॉ. दिलीप झळके अप्पर पोलीस आयुक्त यांचे स्पष्ट मनोगत

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
जिद्द, चिकाटी, प्रामाणिकता, वेळेचे योग्य नियोजन व स्वयंशिस्त प्रथम अंगीकृत करूनच आयएएस व आयपीएस अधिकारी बनवण्याची स्वप्ने विद्यार्थ्यांनी बघितली पाहिजे व त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची उर्मी बाळगली पाहिजे.
विद्यार्थ्यांनो स्वयंशिस्त बाळगत खरोखरच प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल. तर तुम्हाला कुठलीच परिस्थिती अधिकारी बनण्यापासून रोखू शकत नाही असे स्पष्ट मनोगत माजी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके यांनी संवाद कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

प्रसंगी शेतकरी कुटुंबातील जन्मलो असल्याने कृषीविषयक पर्यावरणाची प्रेम व जीवनाचा प्रवास.. मांडला आपल्या कार्य काळातील प्रशासनिक अनुभव याचा मागोवा घेत. औरंगाबाद कारागृह डी आय जी ,गडचिरोली भंडारा, गोंदिया परभणी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक , नक्षलवादी विरोधी विशेष अभियान प्रमुख अँटी करप्शन विभाग प्रमुख विविध ठिकाणचा प्रशासनिक सेवेतील अनुभव त्यानंतर खडतर सेवा, प्राविण्यपूर्ण सेवा पदक, केंद्र शासन इंटरनल सेक्युरिटी मेडल अनेक गौरव मिळालेत परंतु भारावून गेलो. नाही शेती हा छंद जोपासत मातीशी नातं जोपासून आहे आनंद वाटतो असे प्रांजळ अनुभव याप्रसंगी व्यक्त केले
डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या इंडोरमा हॉलमध्ये आय ए एस व आयपीएस स्पर्धा परीक्षा विषयक विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मी आहे आयएएस होणारच यावर विशेष मार्गदर्शन मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना जागवत खेळीमेळी च्या वातावरणात विविध अनुभव कथन करीत स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, मुख्य मुख्य अतिथी सेवानिवृत्त अप्पर पोलीस आयुक्त डॉ.दिलीप झळके ,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक जनमंच सदस्य अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिरानिक, आयोजक भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे व संस्थेचे सचिव डॉ .कार्तिक शिंदे डॉ.जयंत वानखेडे, जनमंच ग्रामीण कार्यकारी पदाधिकारी श्रीकांत देवळे ,प्रमोद रामेकर , (विद्यापीठ संगीत विभाग प्रमुख) प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत प्रा .डॉ.प्रशांत पाठक, प्रज्ञा लांडे, नेहा मानकर, प्रा. डॉ. सुधीर मोते, प्रा.किशोर ढोक, प्रीती मॅडम, सीमा हवेलीकर यांनी केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत पाठक, प्रास्ताविक डॉ.जयंत वानखेडे यांनी केले. पाहुण्यांचा जीवन परिचय विदर्भाचे मुख्य संयोजक रवींद्र तिराणिक करून दिला. विशेषता कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. नरेशचंद्र घाठोळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह जिज्ञासा आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.कपिल राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा .रमेश चव्हाण, प्रा.गुंडवार, प्रा. मांदळे, प्रा. पोटदुखे, प्रा.वानखेडे, प्रा. झकूलवार, शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये