ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
“घुग्घुसमध्ये गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम”

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :_ येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ या घोषणेद्वारे देशवासीयांत नवी ऊर्जा निर्माण करणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव विनोद चौधरी, युवा नेते अमोल थेरे, आकाश निभ्रड, धनराज पारखी, असगर खान, संदीप तेलंग, हेमंत कुमार, गणेश राजुरकर, निखिल आत्राम, सौरभ कागदेलवार, भारती परते, प्रिया नाभिडकर व जाई आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.