Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात लावलेल्या विद्युत ताराच्या प्रवाहाणे वन्य प्राणी (डुकर ), दोन व्यक्ती ठार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्य प्राणी सह दोन व्यक्ती ठार झाल्याची घटना नागभीड पोलीस नोंदीवरून घेण्यात आली आहे.
नागभीड शहराला लागून असलेल्या शेताशिवारात वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात हौदोस असल्याने शेत पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये यासाठी शेतकरी यांना झटका लागून वन्य प्राणी नुकसान करू नये अशी वन विभागाकडून व्यवस्था केली जाते मात्र इतर ठिकाणी शेतकरी ऐवजी विद्युत ताराचा प्रवाह सोडून बंदोबस्त करीत असतात यामुळे आज नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घटना दिसून येत आहेत. काल दिनांक १९जानेवारीला शेतकरी नारायण दामोधर लेणेकर ह्यांनी आपले शेत पिकाचे वन्य प्राणी नुकसान करू नये म्हणून बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह आपल्या शेतात सोडण्यात आला होता.
यावेळी या प्रवाहात वन्य प्राणी डुकर अडकून ठार झाला तर त्याचेच शेताचे बाजूला असलेला शेतकरी ताराच्या प्रवाहात अडकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असता शेतकरी नारायण लेणेकर यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे तक्रार नोंदविली. तसेच नागभीड शेतशिवारातच दुसरा शेतकरी दाचेवार यांची भाड्याने शेती करतो तो काल सायकली पाण्याची मोटार पम्प सुरु करण्यास गेला असता त्याला विद्युत ताराचा प्रवाहाचा स्पर्श होऊन अडकल्याने देवनाथ रामदास बावानकर वय ४५, नागभीड व गुरूदास श्रीहरी पिसे वय ५२वर्ष नागभीड हे दोघेही प्रवाहाणे ठार झाले असून सदरचा गुन्हा दाखल करून न्यायालयात शेतकऱ्यांस हजर करण्यात आले असता मा न्यायालयाने न्यायालय कोठडी सुनावली असून अपराध क्रमांक ३४४/२४अन्वये कलम ३०४भा द वी दाखल करून पोलीस निरीक्षक योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक आकाश साखरे पुढील तपास करीत आहे सदर घटनेचा वन विभाग, वीज वितरण कंपनी यांनीही आपला पंचनामा करून गुन्हा दाखल केला असल्याचे विस्वासनिय सूत्राकडून कळते.
पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी शेतकऱ्यांना आपलें शेतातील पीक नुकसान होऊ नये यासाठी सोलर किंवा बॅटरी तारांचा प्रवाह सुरु करावा मात्र विद्युत प्रवाह लावण्यास कायद्याने गुन्हा आहे असे करणाऱ्यास शिक्षा भोगावी लागते असे सांगितले.
शेतात शेतपिकाचे नुकसान होऊ नये यासाठी विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत पावलेले वन्य प्राणी डुकर व पंचनामा करीत असलेले वनपाल तावडे व वनरक्षक खोब्रागडे, चमू. उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये