Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजासन येथे नंदीबैल सजावट स्पर्धेला उत्तम प्रतिसाद!

'एक गाव एक ग्रंथालय' ठरले आकर्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शहरातील विजासन येथील लहान हनुमान उत्सव समितीच्या वतीने गांधी चौक येथे तानहा पोळा निमित्य नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 141 नंदीबैल धारकांचा समावेश होता .यात साई सौरभ कुलथे याने ‘एक गाव एक ग्रंथालय’ हा प्रकल्प साकारून ग्रंथालयाचे किती महत्त्व आहे हे त्यातून दाखविले हे विजासनवाशी यांचे आकर्षण ठरले.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक आरुषी पारशिवे, द्वितीय श्रेयश भोयर, तृतीय आर्यन गाताडे, चतुर्थ पियल पायघन, पाचवे तेजस मांडवकर, सहावे अनोखी भोगळे यांनी पटकाविले नगरसेवक सुधीर सातपुते, पंढरी पिंपळकर, दिलीप रोगे, विशाल डोंगे, किशोर बेलेकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना पुष्पगुच्छ रोख रक्कम व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने विजासनवाशीयांची उपस्थिती होती या स्पर्धेचे परीक्षण धनराज पारशे, पंढरी खिरटकर, दिलीप रोगे, प्रकाश पायगन यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीते करिता लहान हनुमान उत्सव समिती तथा विंजासनवासी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये