ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराटे चॅम्पियन उत्कर्ष आदे यास किटचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

चकपिरंजी येथील युवक उत्कर्ष योगेंद्र आदे, वय २३ वर्षे याने आपली क्षमता ओळखून तालुकया सोबतच जिल्हास्तरावर चकपिरंजी गावाचे नाव लौकिक केले.सदर युवक हा कराटे चॅम्पियन असून तालुक्यातील युवकासाठी तो आदर्श बनला आहे.घरातील परिस्थिती गरीब असून या युवकाने हार न मानता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहे.चकपिरंजी वासीय जनतेकडून त्याचे कौतुक केल्या जात आहे.

आज योगेंद्र आदे या युवकास ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युवराज पेंदाम,ग्रामपंचायत चकपिरंजी येथील उपसरपंच अरविंद भैसारे यांच्याकडून त्याला कराटे किट भेट देण्यात आली.

यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.उषाताई गेडाम, ग्रा.पं.सदस्य मेहमुदा शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिवाकर नैताम,भाष्कराव दरडे, नानाजी तावाडे, मा.रामनाथ चौधरी,गजानन आदे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये