ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दगडवाडी शिवारात शॉट सर्किटमुळे आग 

शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी शिवारात आज दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी सुधाकर जायभाये यांचे शेतातील उभ्या ज्वारिच्या पिकाला विद्युत शॉर्ट सर्किट मुळे आग लागुन हजारो रुपयांचा चारा व ज्वारी जळुन खाक झाली.

कडक ऊन व हवा असल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेतातील गव्हाचे काड असल्यामुळे आग दुर पर्यंत पसरली यामध्ये सुधाकरराव बाजीराव जायभाये यांच्या एक एकर शेतातील ज्वारी व चारा जळुन खाक झाला यामध्ये अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीने पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये