ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी वाहक म्हणतात वरोरा – भद्रावती वाले एसटीत बसू नका

चंद्रपूर बस स्थानकातील प्रकार : वाहतूक नियंत्रकाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

               चंद्रपूर बस स्थानकावर गेल्या काही महिन्यापासून प्रवाशांची चिकाट गर्दी बघावयास मिळत आहे. वरोरा भद्रावती मार्गे जाणाऱ्या इतर एस टी डेपोच्या बसेस लागल्या की प्रवाशांची चांगली झुंबड होते. त्यात एसटी बस वाहक वरोरा – भद्रावती वाले एस टीत बसू नका असे म्हणतात. त्यामुळे प्रवाशांना कित्येक तास बस स्थानकावर तातकळत उभे राहावे लागते. मात्र या प्रकाराकडे एसटी वाहतूक विभागाने दुर्लक्ष केले आहे.

            महाराष्ट्र राज्य सरकारने वयोवृद्धांना अर्धी तिकीट देऊन आरक्षण दिले. आता महिलांना सुद्धा अर्धी तिकीट देऊन आरक्षण दिल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रवास करत आहे. एसटी महामंडळाने गेल्या काही महिन्यापासून एसटी बस नादुरुस्तीच्या नावाखाली मोजक्याच बसेस धावत आहेत. त्यात नागपूर, वर्धा, यवतमाळ, चिमूर, वणी मार्गे जाणाऱ्या बसेस भद्रावती – वरोरा मार्गे जाताना या बसेस मध्ये या भागातील प्रवासी बस पकडण्यासाठी गेले तर त्यांना वाहक बसण्यास मनाई करतात. त्यात वरोरा – भद्रावती जाण्यासाठी स्पेशल बसेस कमी आहेत त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. मात्र या प्रकाराकडे लोकप्रतिनिधीने सुद्धा दुर्लक्ष केले आहे. सणासुदीचे दिवस नसताना प्रवाशांचे या प्रकारे हाल होत आहे. तर सणासुदीच्या दिवसाला प्रवाशांचे काय होईल असा प्रश्न प्रवाशांसमोर पडला आहे. चंद्रपूर वाहतूक महामंडळानी प्रवाशांची समस्या जाणून अतिरिक्त एसटी बसेस सोडाव्या अशी मागणी प्रवासी वर्गात केलीजात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये