ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सुंदर माझे उद्यान’ व ‘सुंदर माझी ओपन स्पेस’ स्पर्धेचे विजेते फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे घोषित

"माझ्या शहरासाठी माझे योगदान" या थीमवरील वार्डस्तरीय स्पर्धा

चांदा ब्लास्ट

एकूण ४० संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम केले पुर्ण

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २३ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या ‘सुंदर माझे उद्यान’ व ‘सुंदर माझी ओपन स्पेस’ स्पर्धेचे विजेते फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे घोषित करण्यात आले असुन सुंदर माझे उद्यान स्पर्धेत सिव्हील लाईन येथील जलमंदीर उद्यान संघ तर सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत सरकार नगर येथील कर्मवीर खुले मैदान संघांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
      मनपातर्फे “माझ्या शहरासाठी माझे योगदान” या थीमवरील वार्डस्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ५८ संघांनी नोंदणी केली होती. २३ जुलै ते ३० ऑगस्ट पर्यंत घेण्यात आलेल्या स्पर्धेतुन काही संघांनी नंतर माघार घेतली तर १९ उद्यान व २१ ओपन स्पेस असे मिळुन एकुण ४० संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पुर्ण केले.
         स्पर्धेत प्रथम बक्षीस १ लक्ष रोख व त्या वॉर्डमध्ये विकास व सौंदर्यीकरणाचे कामे करण्यास ११ लक्ष रुपये, द्वितीय ७१ हजार व त्या वार्डासाठी ७ लक्ष रुपये तर तृतीय बक्षीस ५१ हजार रोख व त्या वॉर्डच्या विकास व सौंदर्यीकरणासाठी ५ लक्ष रुपयांचे तृतीय बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
      स्पर्धेचा कालावधी संपल्यावर सर्व संघांनी आपल्या कामाचे सादरीकरण मनपात केले होते. त्रयस्थ निरीक्षकांद्वारे प्रत्यक्ष स्थळ व सादरीकरण पाहुन गुणांकन देण्यात आले. यात उद्यान स्पर्धेत प्रथम जलमंदीर उद्यान,द्वितीय दीनदयाळ उद्यान संघ तुकूम तर तृतीय क्रमांक महात्मा बसवेश्वर उद्यान वडगाव या संघाला मिळाला. तसेच तुलसी नगर बाल उद्यान संघ,श्री. स्वामी समर्थ शिवनेरी उद्यान तुकूम,स्व.कल्पना चावला उद्यान,सिद्धिविनायक उद्यान,गुरुकुंज उद्यान तुकूम या संघांना प्रत्येकी ३ लक्ष रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे.
     ओपन स्पेस स्पर्धेत सरकार नगर येथील कर्मवीर खुले मैदान संघ प्रथम,द्वितीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघ तर तृतीय बक्षीस पसायदान जेष्ठ नागरीक संघ  या संघाला मिळाला. तसेच सिद्धिविनायक मंदीर खुली जागा संघ,साई मंदीर ओपन स्पेस,जेष्ठ नागरीक संघ महेश नगर,श्रम साफल्य गृहनिर्माण सोसायटी वडगाव,त्रिमुर्ती नगर उद्यान हवेली गार्डन व जटपुरा हनुमान सखी मंच या संघांना प्रत्येकी ३ लक्ष रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे.
 स्पर्धेत लोकसहभागाने शहरासाठी झालेले कार्य – 
१. भाग घेतलेल्या संघांद्वारे अंदाजे ८२ हजार ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा – भिंती उत्कृष्टपणे रंगविण्यात आल्या.
२. शहरात जवळपास १५०० झाडे लावण्यात आली.    
३. जवळपास ३६ हजार किलो टाकाऊ प्लास्टीकचा वापर करून टिकाऊ वस्तू तयार करण्यात आल्या.
४. ओल्या सुक्या कचऱ्याचे २१० कचरा पेट्या बनविण्यात आल्या.
५. २० उद्यान व ओपन स्पेस संघांद्वारे प्लास्टीक बंदी आणि कापडी पिशवीचा वापर या विषयावर २० वार्डांमध्ये रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.  
६. स्पर्धकांनी बनविले २५ शिल्प व कारंजे.
७. २५ कंपोस्ट पीट व २८ शोष खड्डे बनविण्यात आले
८. स्पर्धकांनी खुल्या जागेत वापरण्यायोग्य २५ मैदाने तयार केली.  

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये