ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या

उलगुलान संघटनेचे पोलिसांना निवेदन

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील विद्यानगर वार्डातील शांतीनगर मधील एका युवकाला 6 तारखेला अमानुष मारहाण करत त्याचा पाच जणांना खून केला.तर एक जण गंभीर जखमी आहे.पोलिसांनी पाचही आरोपीना अटक केली. यात महिलांचा सुद्धा समावेश आहे.हे सर्व आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेने केली असून राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी बल्लारपूर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

विद्यानगर वार्डातील शांतीनगर मध्ये राहणारे नगराळे यांच्या घरी द्वेष भावनेने काही लोक मारण्यासाठी गेले होते.दरम्यान परिसरातील दोन युवक त्यांना वाचविण्यासाठी गेले असता एका युवकाला अमानुष मारहाण करत त्याचा आरोपींकडून खून करण्यात आला तर एक युवक गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे.दरम्यान पोलिसांनी काही महिला आरोपींसह युवकांना अटक केली.अटकेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.यावेळी मनोज तोडसाम अरूणा तोडसाम प्रदीप झामरे अविनाश रामटेके सुजाता ढोले संघ्या किनाके लिना आत्राम राधा उपासे क्षमा रणदिवे भारती कदम रेखा देशभ्रतार आदि नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये