देऊळगाव राजा येथे अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील सहकार विद्या मंदिर, जाफ्राबाद रोड चे बाजुला एक अनोळखी इसमाचे पुरूष जातीचे प्रेत, वय 45 वर्षे, मृत अवस्थेत पडलेले 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता आढळून आले, शिराळा येथील रहिवासी युवराज सरडे यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली, माहितीवरुन नमुद घटनास्थळी जावुन पोलिसांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी एक अनोळखी इसमाचे पुरूष जातीचे प्रेत, वय 45 वर्षे, मृत अवस्थेत आढळुन आले. सदर मृतकाचे डोक्यास व उजवे पायाला खालुन घोटयाला व पाठीला घासुन मार लागलेला दिसुन आला सदर ठिकाणी बारकाईने पाहणी केली असता अनोळखी अज्ञात महिंद्र कंपनीचे वाहनाचा लोगो व फायबरचे तुकडे दिसुन आले.
तरी, अज्ञात वाहन चालक याने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन एक अनोळखी इसम, वय 45 वर्षे यास ठोस देवुन त्याचे मरणास कारणास कारणीभुत ठरला आहे. अशा आशयाची लेखी रिपोर्ट वरुन तसेच एम एल सी मेमो द्वारे मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल देवीचंद चव्हाण करीत आहे.
					
					
					
					
					


