ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र नागपुर यांची लोकसभा निवडणुक पुर्व तयारी संबंधाने वर्धा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि.12/04/2024 रोजी 12/00 ते 17/00 वाजता दरम्यान मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र नागपुर. यांची निवडणुक पुर्व तयारी संबंधाने वर्धा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये लोकसभा निवडणुक शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेली तयारी या खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

1) अवैध धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाया

2) अवैध धंदे करणारे व शरीराविरुध्द गुन्हे करणारे तसेच सामाजिक शांतता बिघडवणारे, निगराणी बदमाश यांचेवर विविध कायद्यान्वये करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई.

3) फरार, पाहीजे आरोपी यांचा घेण्यात आलेला शोध

4) अटक वारंट, स्टेंडीग वारंट ची करण्यात आलेली बजावणी.

5) लोकसभा निवडणुक बंदोबस्त तैनाती संदर्भात करण्यात आलेली योजना व लावण्यात आलेला संपुर्ण बंदोबस्त.

6) डायल 112 वरील सतर्क प्रतिसाद.

मा.श्री. छेरींग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपुर परिक्षेत्र नागपुर यांनी वरील बाबीचा आढावा घेवुन सदर अनुषंगाने मार्गदर्शन केले.

सदर बैठकी करिता मा. श्री नूरुल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री सागर कवडे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री, राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव, श्री प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, श्री देवराव खंडेराव उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी, श्री पुंडलीक भटकर पोलीस उप अधिक्षक (गृह), तसेच सर्व ठाणेदार वर्धा जिल्हा, जिल्हा विशेख शाखा, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील अधिकारी व निवडणुक सेल वर्धा चे संपुर्ण अधिकारी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये