ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षच नाही!

तालुक्यात आरोग्य सुविधांचे तीन-तेरा ; यंत्रणेवरील लाखो रुपयांचा खर्च शासनाचा पाण्यात?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 सद्यस्थितीत तालुक्यासह शहरातील उन्हाचा पारा 40 अंश ते 44 सेल्सिअसच्या आसपास पोहोचलेला असतानाही, देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड तसेच इतर उपकेंद्रात उष्माघात कक्षच कार्यान्वित करण्यात आलेला नसल्याचे दि. 12 मे रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले. शासनाने १ एप्रिल २०२५ पासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले असतानाही, तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. हेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या अंतर्गत उपकेंद्र यांच्यावर कार्यरत कर्मचारी अधिकारी यांच्या पगारापोटी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करते परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षेतेमुळे हा सर्व खर्च निरर्थक ठरत असल्याचे आज केलेल्या पाहणीत आढळून आले.

सर्वसामान्य तसेच गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावे, म्हणून शासकीय रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे; मात्र उष्माघाताचा धोका वाढत असतानाही आरोग्य विभाग उदासीन आहे. याकडे ग्राम पातळीवरील लोकप्रतिनिधी सरपंच आणि इतरांचे दुर्लक्ष सुद्धा होत असल्याचे जाणवले.

 *प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधानाचा सुकाळ*

देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड अंतर्गत 29 गावे येतात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि च्या अंतर्गत कार्यान्वित उपकेंद्रासाठी आणि त्यांच्या शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने चालत असल्याचे दिसून येत आहे. अनेक रुग्णांना किरकोळ आजारासाठीसुद्धा खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला कार्यरत कर्मचारी देत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि औषधी साठा यावर होणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च हा निरर्थक ठरत असल्याचे या ठिकाणी वास्तव उघडकीस आले.

*शासनाचा खर्च पाण्यात*!

शासन दरमहा लाखो रुपये आरोग्य सेवेसाठी खर्च करत असूनही, येथील निष्काळजी कारभारामुळे रुग्णांना अपेक्षित सेवा मिळत नाही. उष्माघात कक्ष नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे, रुग्णांचे हाल होत आहेत. शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा औषधी साठा उपलब्ध असताना सुद्धा कोणतीही बिमारी असो रुग्णांना दोन किंवा तीन प्रकारच्या औषधी देऊन त्यांची बोळवण केल्या जाते. त्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र उपलब्ध असून सुद्धा त्याचा फायदा रुग्णांना होत नाही त्यामुळे या उपकेंद्रांचा फायदा तरी काय असे रुग्णांनी या वेळेस सांगितले.

*उष्माघात कक्ष म्हणजे काय?’ कर्मचाऱ्यांना माहितीच नाही*!

प्रतिनीधीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्धारित वेळेत सकाळी साडे वाजता रुग्णालयाला दिलेल्या भेटीत विचारणा केली असता, उपस्थित कर्मचाऱ्यांना ‘उष्माघात कक्ष म्हणजे काय’ याचीही माहिती नव्हती. त्यामुळे उष्माघाताचे लक्षणे असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत आहे, हे वास्तव समोर आले.

 *जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावे आणि कार्यरत कर्मचारी* तालुक्यातील जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तालुक्यातील एकूण 29 गावे येत असून या गावांसाठी आठ आरोग्य सेविका आणि नऊ आरोग्य सेवक कार्यरत आहेत. जवळखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण सहा उपकेंद्र आहेत यामध्ये बोराखेडी बावरा, असोला जहांगीर, गिरोली खुर्द, भिवगाव बुद्रुक, सावखेड भोई, सिनगाव जहांगीर, आणि मेहुना राजा या सर्व उपकेंद्रावर एक आरोग्य सेवक आणि एक आरोग्य सेविका यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी कार्यान्वित आहेत यांची ही स्थिती सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच असल्यामुळे ग्रामीण भागात कार्यरत उपकेंद्र हे फक्त नावालाच आहे की काय असा प्रश्न ग्रामीण जनतेला पडलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना असून सुद्धा सदरचे अधिकारी दखल का घेत नाहीत हे मात्र या ठिकाणी अनुत्तरीत आहे. तालुक्यात कार्यरत कर्मचारी आरोग्य सेविका आरोग्य सेवक आणि इतर कर्मचारी यांना निर्धारित केलेल्या दिवशी सदर गावात जाऊन पाणी नमुने आणि आरोग्य सुविधा देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे, जवळखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेची अडचण असल्यामुळे आतापर्यंत उष्माघात कक्ष कार्यान्वित नाही परंतु जागेची निर्मिती करून तो कार्यान्वित करण्यात येईल. असे एस. आर. बनसोड – तालुका आरोग्य अधिकारी देऊळगाव राजा यांनी सांगितले , सिनगाव जहांगीर येथे आरोग्य विभागाचे उपकेंद्र कार्यान्वित आहे परंतु या ठिकाणी कार्यरत कर्मचारी नियमित हजर राहत नसून त्यांना हजर राहण्याविषयी निर्देश देण्यात यावे. सदरच्या ठिकाणी उष्माघात कक्ष हा सुद्धा कार्यान्वित नाही तो सुद्धा सुरू करण्यात यावा जेणेकरून गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील रुग्णांना सुविधा उपलब्ध होईल असे- संतोष बंगाळे यांनी म्हटले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये